🕒 1 min read
लखनऊ : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा(Aashish Mishra) याला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. आशिष मिश्रा हा गृहराज्यमंत्री अजय मिश्रा(Ajay Mishra) यांचा मुलगा आहे. आशिष मिश्रा यांच्या वकिलाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे.
आशिष मिश्रा यांच्यावर ३ ऑक्टोबर रोजी तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात निषेध मोर्चा दरम्यान चार आंदोलक शेतकऱ्यांना आणि एका पत्रकाराला कारखाली चिरडल्याचा आरोप आहे. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना अटक करण्यात आली. यूपीमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. यूपीमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे, तर लखीमपूर खेरीमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.
दरम्यान, लखीमपूर खेरी प्रकरणी दाखल झालेल्या पहिल्या आरोपपत्रात केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला आरोपी ठरविण्यात आले होते. या महिन्याच्या सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने स्थानिक न्यायालयात पहिले ५,००० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यादरम्यान विशेष तपास पथक हजारो पानांचे आरोपपत्र घेऊन लखीमपूर खेरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पोहोचले होते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या:
- कर्नाटकातील हिजाबचे पडसाद महाराष्ट्रातही; मुंबईतील ‘या’ कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावर बंदी
- मनसेची भूमिका हिंदुत्वाची, हिजाब वादावर मनसेची प्रतिक्रिया
- IND vs WI: काय सांगता…! सामन्यात केल्या फक्त १८ धावा तरी कोहलीने केला नवा विक्रम
- हिजाब प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात वर्ग करण्यास सर्वोच्च न्यायलायचा नकार
- ‘किंग’ बनायचयं, ‘किंग मेकर’ नाही; शिवतीर्थ’वरील बैठकीनंतर मनसेची भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
