Share

‘किंग’ बनायचयं, ‘किंग मेकर’ नाही; शिवतीर्थ’वरील बैठकीनंतर मनसेची भूमिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर मनसेची (MNS) आज महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुंबईसह इतर महापालिकेतील (BMC) नेत्यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीत ज्या विविध समित्या तयार करण्यात आल्या आहेत त्यांच्या अध्यक्षांच्या सदस्यांची नावं घोषित करण्यात आली आहेत.

या बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaokar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नांदगावकर म्हणाले, या बैठकीत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय कामे करायची आहेत याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप जे सुरू झाले आहेत त्यावर बोलताना नांदगावकर म्हणाले, आरोप-प्रत्यारोप पूर्वी पासून होत आले आहेत आणि होत राहणार आहेत, मात्र लोकांच्या समस्या आहेत त्या तशाच आहेत, त्यामुळे आम्ही लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन पुढे जाणार आहोत.

बाळा नांदगावकर यांना मनसे ‘किंग मेकरच्या’ भूमिकेत असणार का, असा प्रश्न विचारला असताना, नांदगावकर म्हणाले, ‘किंग मेकर’ कशाला आम्ही तर ‘किंग’ बनणार आहोत. त्यामुळे ज्यांना कोणाला आम्हाला साथ द्यायची असेल ते देतील. तसेच हिजाब प्रकरणी बोलताना नांदगावकर म्हणाले, आमच्या पक्षाची भूमिका हिंदुत्वाची भूमिका आहे, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!