Share

पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता; आठवलेंनी दिले संकेत

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. येत्या २१ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन आहे. जीएसटी, नोटबंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरुन सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असणार आहे.

याचाच धागा पकडत सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. तसेच ठाकरे सरकार बाबत सकारात्मक आठवले यांनी भाष्य केलं आहे. पुन्हा राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत आठवले यांनी यावेळी बोलताना दिले. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना बोलत होते.

ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात हे दोन महिने भूकंपाचे आहेत. एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा झाला. आता कोणाचा होणार आहे, ते आपण पाहणार आहोत. मात्र, कोणता-ना-कोणता भूकंप होण्याची शक्यता आहे, असे आठवले यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेना-भाजपा महायुतीचे सरकारच स्थिर आणि टिकाऊ सरकार ठरेल. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला सावरकरांचा अवमान शिवसेनेला सहन होत नसेल तर त्यांनी राज्यातील काँग्रेसच्या पाठिंब्यावर स्थापन केलेले सरकार बरखास्त करावे, अशी मागणी आठवले यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1206412381082927106?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206410631659712513?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!