Share

Narayan Rane | “कसला आदित्य ठाकरे, काय कळतं त्याला” ; नारायण राणे का संतापले?

Published On: 

मुंबई : भारतीय कंपनी वेदांत आणि तैवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉन यांचा १.५४ लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. या घोषणेनंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. प्लांटच्या स्थलांतरामुळे काही “अशुभ” झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी आदित्य ठाकरे देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिंदे गटावर महाराष्ट्राशी गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर घणाघात करत पलटवार केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या टीकेवर नारायण राणे म्हणाले, “कसला आदित्य ठाकरे काय कळतं त्याला, थोड्या दिवसात सर्व बाहेर येईल. आता त्यांचा काळ संपला आहे. भविष्यात मंत्री, मुख्यमंत्री संधी त्यांना मिळणार नाही त्यामुळे ट्वीट करत राहा.”

उद्धव ठाकरेंच्या पापामुळे कंपनी दुसरीकडे गेली-

“उद्धव ठाकरेंना काही काम नाही, एकतर घर सोडत नाहीत. अडीच वर्ष मातोश्रीत होते आताही तिथेचं आहेत. फक्त बोलायचं आहे आणि ब्रेकींग न्यूज द्यायची आहे. फक्त ते बातमी व्हावी म्हणून बोलत आहेत. बाकी ते स्वत: काही करु शकले नाहीत. तसेच त्यांनी केलेल्या पापामुळे वेदांता फॉक्सकॉन कंपनी दुसरीकडे गेली आहे,” असा घणाघात नारायण राणे यांनी केला.

महाराष्ट्राशी देखील गद्दारी – आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे म्हणाले, “गद्दार सरकारने शिवसेनेशी गद्दारी तर केलीच पण त्यांनी महाराष्ट्राशी देखील गद्दारी केली. आता सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण आहेत हे सुद्धा आपल्याला माहित नाही आहे. निवडणुका लागतील तेव्हा सत्य लोकांसमोर येणार आहे. वेदांता प्रकल्पासाठी त्यांच्या टीमने तळेगाव येथील जागा निवडली होती. १ लाख ५० हजार कोटीची गुंतवणूक होती. एक लाख रोजगार निर्माण होणार होते. यामुळे आम्ही सगळे अनिल अग्रवाल साहेबांशी बोलत होतो भेटत होतो. मात्र नंतर ४० गद्दारांनी गद्दारी करुन सरकार पाळलं. वेदांता प्रकल्पासाठी पाठवरुवठा करायचा असतो तो कमी पडला असेल. हे गुणंतवणूकदार गुजरातला निघून गेले याची मला आज लाज वाटते.”

उद्योगमंत्री कोण आहेत-

यावेळी उद्योगमंत्री कोण आहेत, असा सावल आदित्य ठाकरे यांनी केला. यावर जनतेतून गद्दार असा आवाज आला. त्यांनी गद्दारी शिवशेनेशी नाही तर आज महाराष्ट्राशी केली आहे, असे आदित्य म्हणाले. वेदांता प्रकल्प निघून गेला, उद्योगमंत्र्याना विचारलं तर ते म्हणातात माहिती घेऊन सांगतो, असे उद्योगमंत्री होऊ शकतात का?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. आदित्य ठाकरे म्हणाले, मी ३२ वर्षाचा तरुण सरकारमधून बाहेर पडल्यानंतर वेदांता प्रकल्पाबद्दल सांगू शकतो तर मग आताचे उद्योगमत्री का सांगू शकत नाहीत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!