मुंबई : भारतीय कंपनी वेदांता आणि तैवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉन यांचा १.५४ लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. या घोषणेनंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. प्लांटच्या स्थलांतरामुळे काही अशुभ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी आदित्य ठाकरे देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिंदे गटावर महाराष्ट्राशी गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर घणाघात करत पलटवार केला आहे.
“उद्धव ठाकरेंना काही काम नाही, एकतर घर सोडत नाहीत. अडीच वर्ष मातोश्रीत होते आताही तिथेचं आहेत. फक्त बोलायचं आहे आणि ब्रेकींग न्यूज द्यायची आहे. फक्त ते बातमी व्हा म्हणून बोलत आहेत. बाकी ते स्वत: काही करु शकले नाहीत. तसेच त्यांनी केलेल्या पापामुळे वेदांता फॉक्सकॉन कंपनी दुसरीकडे गेली आहे,” असा घणाघात नारायण राणे यांनी केला.
आदित्य ठाकरेंच्या टीकेवर नारायण राणे म्हणाले, “कसला आदित्य ठाकरे काय कळतं त्याला, तो कंपनीकडे काय मागणी करत होता हे थोड्या दिवसात बाहेर येईल. आता त्याचा काळ संपला आहे. भविष्यात मंत्री, मुख्यमंत्री संधी त्यांना मिळणार नाही त्यामुळे ट्वीट करत राहा. ते ट्वीट कोणी वाचणार सुद्धा नाही.”
महाराष्ट्राशी देखील गद्दारी – आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे म्हणाले, “गद्दार सरकारने शिवसेनेशी गद्दारी तर केलीच पण त्यांनी महाराष्ट्राशी देखील गद्दारी केली. आता सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण आहेत हे सुद्धा आपल्याला माहित नाही आहे. निवडणुका लागतील तेव्हा सत्य लोकांसमोर येणार आहे. वेदांता प्रकल्पासाठी त्यांच्या टीमने तळेगाव येथील जागा निवडली होती. १ लाख ५० हजार कोटीची गुंतवणूक होती. एक लाख रोजगार निर्माण होणार होते. यामुळे आम्ही सगळे अनिल अग्रवाल साहेबांशी बोलत होतो भेटत होतो. मात्र नंतर ४० गद्दारांनी गद्दारी करुन सरकार पाळलं. वेदांता प्रकल्पासाठी पाठवरुवठा करायचा असतो तो कमी पडला असेल. हे गुणंतवणूकदार गुजरातला निघून गेले याची मला आज लाज वाटते.”
उद्योगमंत्री कोण आहेत-
यावेळी उद्योगमंत्री कोण आहेत, असा सावल आदित्य ठाकरे यांनी केला. यावर जनतेतून गद्दार असा आवाज आला. त्यांनी गद्दारी शिवशेनेशी नाही तर आज महाराष्ट्राशी केली आहे, असे आदित्य म्हणाले. वेदांता प्रकल्प निघून गेला, उद्योगमंत्र्याना विचारलं तर ते म्हणातात माहिती घेऊन सांगतो, असे उद्योगमंत्री होऊ शकतात का?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. आदित्य ठाकरे म्हणाले, मी ३२ वर्षाचा तरुण सरकारमधून बाहेर पडल्यानंतर वेदांता प्रकल्पाबद्दल सांगू शकतो तर मग आताचे उद्योगमत्री का सांगू शकत नाहीत.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत हलगर्जीपणा? गृहविभागाकडून सुरक्षारक्षकांना वाहनेच दिली नसल्याचा आरोप
- Oppo F21s Pro Series | Oppo ने लॉन्च केले 2 नवीन स्मार्टफोन, जाणून घ्या दोन्हीची सर्व वैशिष्ट्ये आणि किंमत..
- Eknath Shinde | मुंबईचे रस्ते तातडीने दुरुस्तीसाठी साडेपाच हजार कोटींचा निधी – एकनाथ शिंदे
- Sharad Pawar | “कोणत्याही माणसाला घरची ओढ असते” ; वेदांतावरुन शरद पवारांचा मोदींना टोला
- Best 5G Smartphones | ‘हे’ आहेत 40,000 रुपयांच्या रेंज मधील अप्रतिम 5G स्मार्टफोन.. जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

