नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. आठवले म्हणाले की, राहुल गांधी हम दो हमारे दोचा नारा देत आहेत. यामुळेच हम दो हमारे दो करायचे असेल तर राहुल गांधींनी लग्न करायला पाहिजे. आणि त्यांनी जर दलित मुलीशी लग्न केले तर महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण होईल आणि जातियता संपुष्टात येईल.
I have appealed Shibu Soren & Hemant Soren to join NDA. If they do so, then there will be BJP & Jharkhand Mukti Morcha's govt here. They can also get power in Delhi. It can be used for Jharkhand's development. They should think about it: Union Minister Ramdas Athawale in Ranchi
— ANI (@ANI) February 16, 2021
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांना सांगितले की, मी शिबू सोरेन आणि हेमंत सोरेन यांना एनडीएत येण्याचे आवाहन केले आहे. जर त्यांनी तसे केले तर तेथे भाजप आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असेल. यातून त्यांना दिल्लीतही सत्ता मिळू शकते. याचा उपयोग झारखंडच्या विकासासाठी होऊ शकतो. त्यांनी त्याबद्दल विचार केला पाहिजे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधताना म्हटले होते की, “हे सरकार ‘हम दो, हमारे दो’चे सरकार आहे. त्यांनी कृषी कायद्यांना देशातील शेतकऱ्याला संपवण्याचा कायदा म्हटले होते. राहुल म्हणाले की, केवळ दोन लोक हा देश चालवत आहेत. हा कायदा लागू झाल्यानंतर केवळ दोनच लोक चालवतील. सभागृहात राहुल गांधी म्हणाले होते की, कृषी कायद्याच्या कंटेंट आणि इंटेंटवर चर्चा केली पाहिजे. शेतकऱ्यांचा मुद्दा हा अर्थसंकल्पाचा मुद्दा आहे. धान्य, भाजीपाला, फळे हे देशात कुठेही खरेदी केली जाऊ शकतात, देशात जर अमर्याद असेल तर मंडईत कोण जाईल, पहिल्या कायद्याचा हा कंटेंट आहे. तर दुसऱ्या कायद्याचा कंटेंट साठेबाजीला अमर्याद करणे आहे. तिसऱ्या कायद्यानुसार शेतकरी उद्योजकांच्या दावणीला जातील.”
महत्वाच्या बातम्या
- दिशा रवी – ग्रेटा थनबर्ग यांच्यातील व्हॉट्सअप चॅट्स, वाचा Toolkit बाबत काय म्हणाल्या दोघी?
- रिहानाने पुन्हा खाल्ली माती, गळ्यात गणपतीचं पेंडंट घालून पोस्ट केला टॉपलेस फोटो
- BMCचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच, भाजपची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- दिशा रवी अटकेप्रकरणी महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना बजावली नोटीस
- ‘राहुल गांधी दम असेल तर गुजरातेतून निवडणूक लढवून दाखवा!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

