🕒 1 min read
नवी दिल्ली : राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही गंभीर असून, वाढत्या आकड्याला रोखण्यासाठी शासन अधिक कठोर नियम करण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रीय पातळीवर राज्यात आणि राज्याच्या पातळीवर मुंबईत कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने पसरतोय. राज्यात गुरुवारी २२९ कोरोना रुग्णांचे निदान झाले असून, सर्वाधिक रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे.
तसेच स्वच्छता कर्मचारी, डॉक्टर, नर्स, पोलिस आपले कर्तव्य बजावत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांसाठी बाहेर राहत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना’विरोधातील युद्धात सैनिकांप्रमाणे लढणाऱ्या डॉक्टरांना सामाजिक पाठबळ द्या,’ असं भावनिक आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी केलं आहे.
डॉ.हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ समूहाची महत्वाची बैठक पार पडली. बैठकीत कोव्हिड-१९ साठी रूग्णालये उभारण्यासंबंधी सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, ‘नागरिकांना केंद्र सरकारच्या हेल्पलाईन क्रमांक, संकेतस्थळावरून अधिकृत माहिती मिळवता येईल. कुठल्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. प्रत्येकाला पीपीईची आवश्यकता नाही’.
कोरोना संसर्ग होण्याचा जास्त धोका असलेल्या ठिकाणी कार्यरत कर्मचार्यांनाच पीपीईची आवश्यकता आहे. पीपीईचा योग्य वापर होण्यासाठी जागरूकता आवश्यकत असल्याचे मत डॉ.हर्षवर्धन यांनी व्यक्त केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
