मुंबई : कोरोनामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय. या पार्श्वभूमीवर देशाचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सर्व राज्यातील कृषिमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.
राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शेतीची परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यात मांडले. शेतकरी, शेतमजूर आणि शेतीमाल यांच्या वस्तुनिष्ठ परिस्थितीवर यादरम्यान चर्चा झाली.
शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी केंद्राच्या मदतीची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे यांनी यावेळी राज्याचा आढावा सादर केला. शेती, या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातून रब्बी हंगाम गेला असून पुढचा हंगाम सावरण्यासाठी मदतीची मागणी करण्यात आली.
दरम्यान, पंतप्रधान किसान योजनेचा लाभ 50 टक्के शेतकऱ्यांना मिळत नसल्याचंही कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. तर दुसरीकडे देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशभरात एकूण चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
