मुंबई : आजपर्यंत ज्यांनी डॉक्टरांवर हात उचलले त्यांना आता डॉक्टरांचं महत्त्व समजलं असेल. आज मंदिरं बंद आहेत, पण रूग्णालये सुरू आहेत, असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील परिस्थितीवर आपली भूमिका मांडली. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा झाली. यावेळी त्यांना मी देशातील विमानसेवा बंद करण्याची विनंती केली असल्याचे देखील यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘ काही जणांना अजूनही परिस्थितीचे गांभीर्य कळत नाही. कालचा बंद हा आपल्यासाठी होता. ती टेस्ट केस होती. जर लोकांनी ऐकलं नाही तर यापेक्षाही गंभीर पावलं सरकारला उचलावी लागतील. “भारतात जर कोरोना पसरला तर येणाऱ्या काळात काळात ६० टक्के लोकांना हा आजार होण्याची शक्यता आहे. एवढ्या प्रमाणात हा व्हायरस परसला तर आपल्याकडे एवढी यंत्रणा आहे का? कालही संध्याकाळी लोकं थाळ्या वाजवायला घोळका करून बाहेर आली होती. मी हात धुवा असं सांगणार नाही. पण कोरोना आपल्यापाठी हात धुवून पडला आहे. मुठभर लोकांना समज येत नसेल तर सरकार आणि पोलिसांना कठोर निर्णय घ्यावा लागेल. ” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोकरी, शिक्षणानिमित्त स्थलांतर केलेले अनेक लोक अद्यापही गावी परातले नाहीत, तसेच ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना पैसे मिळाले पाहिजेत. हॉटेल बंद ठेवली पाहिजेत. पण त्यांची किचन सुरू राहू द्या. यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही.असेही ते यावेळी म्हणाल. तसेच आपण सर्वांनी स्वच्छता पाळली पाहिजे. काही ठिकाणी ती पाळली पाहिजे. सरकारी यंत्रणा जोमानं काम करतायत. लोकांनी सरकारवर कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका,” असंही आवाहन त्यांनी केलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

