🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या संसर्गाला आळा बसावा म्हणुन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाउन जाहीर केले आहे. या काळात मालिका आणि चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परवानगी नाकारण्यात आली होती.
त्यामुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण बाहेर सुरु आहे. दरम्यान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नट्टू काकांची भूमिका साकारणारे घनश्याम नायक यांच्यावर आर्थिक संकट कोसळले असल्याची सुरू चर्चा होती. परंतु याबाबत घनश्याम नायक यांनी खुलासा केला आहे.
नुकताच घनश्याम नायक यांनी एका मुलाखतीमध्ये या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले. ‘माझ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे अशा अफवा ऐकून मलाच धक्का बसला आहे. लोकं अशा चुकीची माहिती का परसवतात? माहीत नाही. सध्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण सुरु आहे. या शोमधून मला ब्रेक देण्यात आलेला नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्येष्ठ कलाकार महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन चित्रीकरण करण्यास तयार नाहीत आणि ते त्यांच्यासाठी सुरक्षित देखील नाही’ असे नट्टू काका अर्थात घनश्याम नायक यांनी स्पष्ट केल आहे.
तसेच ते लवकरच पुन्हा चित्रीकरणास सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अनेकांच्या मनात या मलिकेने घर केले आहे. तसेच यातील सर्वच पात्र लोकांच्या पसंतीस पडले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मायावतींवर केलेल्या अश्लिल विनोदामुळे अभिनेता रणदीप हुड्डा अडचणीत
- गिरीश कुबेर यांच्या अडचणीत वाढ ; पुण्यामध्ये भाजपकडून पोलिसात तक्रार दाखल
- ‘व्हॉट्सअॅप वापरणा-यांची प्रायव्हसी धोक्यात आणू देणार नाही; मोदी सरकारच्या अटी अमान्य’
- शरद पवार-मुख्यमंत्री ठाकरे भेट : पवारांना माझा सॅल्यूटच; एकनाथ शिंदेंनी केलं कौतुक !
- अर्धे कोविड केअर सेंटर बंद झाल्यानंतर विभागीय पथकाचा हा ‘विशेष’ अहवाल आला समोर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
