🕒 1 min read
मुंबई : एका चुकीच्या शब्दामुळे अथवा वाक्यामुळे मोठ संकट निर्माण होते. अनेक लोक बोलताना अनावधानाने का होईना चुकीचा शब्द वापरतात आणि नंतर माफी मागण्याची वेळ येते. त्यामुळे शब्द जपून वापरले पाहिजे असं वेळोवेळी म्हंटल जात. असच अभिनेता रणदीप हुड्डा याने उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावतींवर अश्लिल विनोद केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये अभिनेता रणदीप हुड्डा एका शो दरम्यान प्रेक्षकांना अश्लिल विनोद सांगत म्हणाला, ‘तुम्हाला मी एक ‘डर्टी जोक’ सांगतो…मिस मायावती दोन लहान मुलांसोबत एका गल्लीमधून जात होत्या…तिथे उभा असलेल्या एका व्यक्तीने त्यांना विचारलं, हे दोन्ही मुलं जुळे आहेत का ? यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, नाही, एक ४ वर्षाचा आहे आणि दुसरा ८ वर्षाचा आहे. त्यानंतर तो माणूस म्हणाला, मला विश्वासच होत नाही की एक व्यक्ती तिथे दोन वेळा जाऊ शकतो.’ त्याच्या या व्हिडीओमुळे रणदीप सध्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.
What is more shocking is the utter confidence with which Randeep Hooda @RandeepHooda cracks this degenerate and vulgar casteist and sexist joke about Mayawati, one of the tallest leaders of the country. https://t.co/2XFRHasgT4
— Nissim Mannathukkaren (@nmannathukkaren) May 25, 2021
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता रणदीपने माफी मागावी, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. ते अनेकांना अभिनेता रणदीप हुड्डाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना यावर विश्वास बसत नाही. रणदीपने त्याच्या दमदार अभिनय कौशल्यांच्या आधारे लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं, त्याच अभिनेत्याकडून असा अश्लिल विनोद ऐकायला मिळाल्याने चाहते नाराज झाले आहेत. यामुळे सोशल मीडियावर अनेकजण प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त करत आहे. अद्याप या बाबाबत रणदीपने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
काही दिवसांपूर्वीच कॉमेडियन अबीश मॅथ्यू याने त्याच्या जून्या ट्वीटसाठी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावतींची माफी मागितली होती. या ट्वीटमध्ये मॅथ्यूने मायावतींबद्दल अपमानजनक पोस्ट लिहिली होती. त्याबाबत अबीश मॅथ्यूला देखील माफी मागावी लागली होती.
महत्वाच्या बातम्या
- गिरीश कुबेर यांच्या अडचणीत वाढ ; पुण्यामध्ये भाजपकडून पोलिसात तक्रार दाखल
- ‘व्हॉट्सअॅप वापरणा-यांची प्रायव्हसी धोक्यात आणू देणार नाही; मोदी सरकारच्या अटी अमान्य’
- शरद पवार-मुख्यमंत्री ठाकरे भेट : पवारांना माझा सॅल्यूटच; एकनाथ शिंदेंनी केलं कौतुक !
- अर्धे कोविड केअर सेंटर बंद झाल्यानंतर विभागीय पथकाचा हा ‘विशेष’ अहवाल आला समोर!
- ‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
