अयोध्या-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराच्या ऐतिहासिक भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. आज दुपारी 12.30 वाजता हा सोहळा पार पडेल. या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आले आहे. या द्वारेच निमंत्रितांना भूमिपूजनाच्या स्थळी प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान, भूमिपूजनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून निमंत्रितही या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे.
अयोध्या ने सभी को एक कर दिया है। अब ये देश पूरी दुनिया में अपना माथा ऊंचा उठाकर कहेगा कि हमारे यहां कोई भेद-भाव नहीं है: राम जन्मभूमि स्थल पर बीजेपी नेता उमा भारती pic.twitter.com/Z2yIScCcf6
— ANI_HindiNews (@AHindinews) August 5, 2020
अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन आज होणार आहे. यानिमित्त भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती अयोध्येत दाखल झाल्या असून अयोध्येनं सर्वांना एकत्र आणलं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
उमा भरती म्हणाल्या, अयोध्येनं सर्वांना एकत्र आणलं. आता देश संपूर्ण जगात मान उंचावून सांगू शकेल की आमच्या देशात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, अशी भावाना मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी योगगुरू बाबा रामदेव अयोध्येत दाखल झाले आहेत. बाबा रामदेव अयोध्येत दाखल होताच त्यांनी हनुमानगढी येथे पूजा केली आहे. यावेळेस बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, 5 ऑगस्ट हा ऐतिहासिक दिवस असून आपल्या कित्येक पिढ्या आजचा दिवस लक्षात ठेवतील. आज आपण रामराज्यात प्रवेश करत आहोत, असा आशावादही त्यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
भूमिपूजनाच्या दिवशीही टीका-टिपण्णी सुरूच,श्रेयवादाच्या मुद्द्यावरून सामनातून भाजपवर टीका
राम मंदिरामुळे देशात ‘रामराज्य’ स्थापित होईल – रामदेव बाबा
मोठी बातमी: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली कोरोना चाचणी! अहवाल आला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

