Share

युजीसीचे आदेश! ‘मोफत लसींसाठी कॉलेज, विद्यापीठात मोदींचे आभार मानणारे बॅनर लावा’

Published On: 

नवी दिल्ली : देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला कालपासून सुरुवात झाली आहे. लस तुटवडा आणि लसीकरणाच्या धोरणावरून विरोधकांसह सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावल्यानंतर केंद्र सरकारने देशातील १८ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, आता लसीकरणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

देशभरात १८ आणि त्यापेक्षा वरील वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण सुरु केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे फलक कॅम्पसमध्ये उभारावेत, अशी सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठ, महाविद्यालय, तंत्रज्ञान संस्थांना एका आवाहनाद्वारे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन आठवड्यापूर्वी देशभरात २१ जूनपासून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. त्यानुसार, देशात २१ जून रोजी देशात तब्बल ६९ लाख लोकांचे रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आले आहे. त्याबद्दल मोदींनी ट्विरवरुन देशवासीयांचे अभिनंदन करत वेल डन इंडिया.. असेही म्हटले आहे. केंद्र सरकारच्या या गतीमान लसीकरण मोहिमेचे आभार मानण्याच्या सूचना विद्यापीठा अनुदान आयोगाने केल्या आहेत.

काय सांगितले विद्यापीठ अनुदान आयोगाने?
बॅनर्स कशा पद्धतीचं असावे, याबद्दलचं डिझाईनही विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगितलं आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा भाषेत हे बॅनर्स आहेत. विद्यापीठांमध्ये लावायच्या बॅनर्सचे डिझाईन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने तयार करून दिले आहे. या बॅनरवर ‘सर्वांच्या मोफत लसीकरणासाठी मोदीजी, धन्यवाद,’ असा आशयाचा मजकूर आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असा उल्लेखही करण्यात आलेला आहे. बॅनरवर पंतप्रधान मोदी यांचा फोटोही आहे.

युजीसीच्या वेबसाईटवर अशा आशयाचा एक बॅनर आधीच झळकला आहे. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असून त्यावर ‘सर्वांसाठी मोफत लस’ अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. ही लसीकरण मोहीम जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असल्याचा दावाही करण्यात आलाय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!