Share

‘शरद पवारांची ही शेवटची धडपड आहे’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप – सेनेत प्रवेश केला आहे. तर अनेक नेते भाजप – सेनेच्या वाटेवर आहेत. या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ढेपाळला आहे. शरद पवारांच्या विश्वासातल्या नेत्यांनी पक्षाला राम राम केलाचं आहे, पण आता नातेवाईक ही पक्षांतर करत आहे. याच संदर्भात श्रीरामपुरच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता. पवारांनी पत्रकारावर संताप व्यक्त केला आणि पत्रकार परिषदेतून जाण्याची विनंती केली.

याविषयी बोलताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. त्यांनी माणूस जेव्हा संपतो तेव्हा काही धडपड शरीरात तयार होते. आता शरद पवारांची ही शेवटची धडपड आहे असं विधान केले आहे. तसेच पुढे बोलताना ज्या पद्धतीने जनतेने त्यांना नाकारले आहे. ते त्यांना आता कळलं आहे. विरोधी पक्षाचा नेताही ते आता तयार करू शकणार नाही. संविधानामध्ये पत्रकार हा महत्वाचा बिंदू आहे. पत्रकारांवर भडकून लोकशाही चालत नाही. पवारांकडून असं अपेक्षित नाही असंही विधान केले आहे.

दरम्यान, श्रीरामपूर येथील पत्रकार परिषदेत शरद पवारांना ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. नेत्यांबरोबर नातेवाईक ही पक्षांतर करत आहेत, असा प्रश्न विचारला असता. शरद पवार संतापले. इथे नातेवाईकांचा काय संबंध आला असा प्रश्न विचारला. असे असभ्य प्रश्न विचारल्या बद्दल तुम्ही माफी मागा अशी मागणी शरद पवार यांनी केली. एक तर पत्रकार परिषदेला मला तरी बोलावत जाऊ नका अन्यथा अशा पत्रकारांना देखील बोलावू नका, असे पवार यावेळी म्हणाले.

याविषयी बोलताना सुप्रिया सुळे यांनी ‘५० वर्षात मी कधीही शरद पवार चिडलेले मी पाहिलेले नाही. पण जर एखाद्याला प्रश्नाचे उत्तर देयचे नसेल आणि वारंवार तेच प्रश्न विचारले जात असतील तर चिडणे स्वाभावीक आहे. या विषयावर मला बोलायचे नाही असे आधी सांगितल असेल आणि तुम्ही ५ वेळा एकचं प्रश्न विचारत असाल तर माणूस चिडू शकतो. कोणत्या प्रश्नाला उत्तर देयचे किंवा नाही देयचे याचा अधिकार आम्हाला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!