Share

Sandipan Bhumre : उद्धव ठाकरे यांच्या वागणुकीमुळे शिवसेना संपली – संदीपान भूमरे

Published On: 

🕒 1 min read

Sandipan Bhumre। मुंबई : शिवसेना खासदार आणि सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतलेला पहिला भाग काल प्रदर्शित झाला. या मुलाखतीवर राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. तर यानंतर आज मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात येत आहेत. शिंदे गटातील आमदार संदीपान भूमरे यांनी आता उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

संदीपान भूमरे म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्या वागणुकीमुळे शिवसेना संपली असे भूमरे यांनी म्हटले आहे. आम्ही अनेकदा उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. आपण महाविकास आघाडीमधून बाहेर पडले पाहिजे, मात्र त्यांनी आमचं ऐकलं नाही, म्हणून आम्हाला बाहेर पडावे लागले. म्हणून आम्ही बंड केले, नाहीतर शिवसेना संपली असती असे संदीपान भूमरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीनंतर आता भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

दरम्यान, आज मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एका जुन्या क्लिपबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले कि, मी मुख्यमंत्री झालो, आता मी होऊन गेलेला आहे, पण प्रॉब्लेम काय तुम्हाला? ज्या बाळासाहेबांचा फोटो लावताय त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवलं? इतकी अडीच वर्ष किंवा त्याच्या आधी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्याची क्लिप वायरल होत आहे. तेव्हा भाजप कसा अत्याचार करतो आहे हे सांगत राजीनामा दिला होता, ही क्लिप आहे, माझ्या समोर त्यांनी राजीनामा दिला होता आणि ते स्वतः बोलत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी त्या क्लिपचाही हिशोब काढला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!