Share

काँग्रेसच्या नेत्यांना देशभक्तांचा पंतप्रधान व्हायचं की देशद्रोह्यांचा?; उद्धव ठाकरेंची जाहीरनाम्यावर टीका

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी देशद्रोहविरोधातला कायदा रद्द करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यावरून काँग्रेसवर टीका होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली होती. त्यांनतर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही कॉंग्रेसवर टीका केली आहे.

काँग्रेसला नेमके काय पाहिजे आहे? काँग्रेसच्या नेत्यांना देशभक्तांचा पंतप्रधान व्हायचं की देशद्रोह्यांचा असा सवाल उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला केला आहे. उद्धव ठाकरे वसई येथे प्रचारासाठी आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

काय आहे कॉंग्रेसचा जाहीरनामा ?

हम निभाएंगे’ असे म्हणत काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला. राहुल गांधींनी घोषणा केली की, आम्ही शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडू. ज्याप्रमाणे रेल्वेसाठी वेगळे अंदाजपत्रक आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांठीही असेल. त्यांच्यावर किती पैसे खर्च होत आहे हे शेतकऱ्यांनाही कळेल. तसेच शेतकऱ्यांनी कर्ज न फेडल्यास क्रिमिनल ऑफेन्स नसेल तर सिव्हील ऑफेन्स असेल, अशीही घोषणा राहुल गांधीनी जाहीरनाम्यात केली आहे.

दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत काँग्रेस पक्षाने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. कॉंग्रेसच्या या जाहीरनाम्याला ‘जन आवाज’ असे नाव देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसचा जाहीरनाम म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने अशा स्वरूपाचा अशी बोचरी टीका केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!