तुळजापूर : महाराष्ट्रात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे बंद करण्याचा निर्णय काही महिन्यापूर्वी घेण्यात आला होता. आता हळूहळू मंदिरे पुन्हा खुली केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेचे मंदीर भाविकांना खुले करण्या पुर्वी काय पुर्व तयारी करावी या संबंधी विविध विभाग प्रमुख व तिन्ही पुजारी मंडळाच्या पदाधिकारी मध्ये मंदीराचा प्रशासकीय कार्यालयात गुरुवार दि18रोजी बैठक झाली
‘देशातील सर्वात मोठी दहीहंडी यंदा फुटणार नाही’
या बैठकीत विविध विषयावर सविस्तर चर्चा होवुन यानंतर ऐक आठवड्याने आणखी एक बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचे विश्वस्त रामेश्वर रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डाँ दिलीप टिपरसे विश्वस्त तथा नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसिलदार तथा प्रशासकीय व्यवस्थापक योगीता कोल्हे, मुख्याधिकारी अशीष लोकरे. धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले जयसिंग पाटील आदींच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
महाराष्ट्र सरकारने मंदीर खुले करण्याचे आदेश दिले तर आपली पुर्वतयारी असावी म्हणून ही बैठक मंदीर समितीने घेतली होती. या बैठकीत सरकारने मंदीर खुले करण्यास परवानगी दिल्या वर भाविकांना कसे दर्शन द्यायाचे या बाबतीत काय करावे लागेल यात सविस्तर चर्चा झाली . यात कोरोना पासुन भाविक पुजारी व्यापारी शहरवासीय यांच्या सुरक्षे बाबतीत काय दक्षता घ्यावी तसेच गर्दी टाळणे यासाठी काय करावे या बाबतीत प्रामुख्याने चर्चा झाली
तेलंगणात मराठी वाघाची छाप ! मराठमोळे अधिकारी महेश भागवतांची अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
यात प्रारंभी प्रायोगिक तत्वावर स्थानिकांना आँनलाईन दर्शन व्यवस्था संख्या एक हजार पर्यत ,दर्शन मंडप ऐवजी थेट राजे शहाजी महाध्दार मधुन भाविकांना मंदीरात दर्शनासाठी सोडणे, यासाठी मंदीरा समोर सोशल डिस्टंन्स राहावा म्हणून रंगाचे बाँक्स तयार करणे,मंदीरात सिंह गाभाऱ्यातुनच दर्शन व्यवस्था, तिर्थक्षेञ तुळजापूर बाहेरच्या भाविकांची चौकशी करुन तिथे त्याचे टेमंपरेचर तपासणी करणे,भाविकांचा पुजारी वृंदाचा घरी मुक्काम असेल तर पुजारी वृदांनी काय दक्षता घ्यावी यावर सविस्तर चर्चा तसेच पुजारी मंडळ व व्यापारी मंडळ यांनी आपआपल्या मंडळीची बैठक घेण्यास या बैठकीत सांगण्यात आले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

