🕒 1 min read
मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. यामुळे सर्वाधिक जागा मिळवून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. शिवसेना आणि भाजपची सुमारे अडीच दशकांची मैत्री तुटल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षभरात भाजपने शिवसेनेसह महाविकास आघाडीवर सातत्याने घणाघात केल्याचं दिसून आलं आहे. तर, महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आता, अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठीच्या निधी संकलन अभियानावरून शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
‘रामाच्या नावाने काही लोक घरोघरी पैसे मागण्यासाठी जात आहेत. पण आपल्याला तसं करायचं नाही. बाबरी मशिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर उतरली होती. आता भाजप पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत. “देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो”,’ असा घणाघात उद्धव ठाकरेंनी आज शिवसेनेच्या बैठकीवेळी केला आहे.
भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल !
‘दुसऱ्या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आपले लोक भाजपमध्ये गेले, नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती. पण भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल,’ असं भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचं ‘शिवसंपर्क अभियान’ चालू शकतं तर मग शिवभक्तांच्या शिवजयंतीवरच निर्बंध का ?
- ‘काँग्रेसचा खोटारडेपणा असाच सुरु राहिला तर काँग्रेस इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही’
- संजय राठोडांनी राजीनामा दिला ही माहिती चुकीची; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
- भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
- आगामी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचं ठरण्याआधीच भाजप-रिपाइंचं ठरलं ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
