Share

आगामी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचं ठरण्याआधीच भाजप-रिपाइंचं ठरलं ?

Published On: 

मुंबई : या वर्षी होत असलेल्या नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आदी मनपा निवडणुका तसेच पुढील वर्षी होत असलेल्या मुंबई महापालिका आणि जिल्हा परिषद, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आरपीआय युती बाबत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भाजप आणि आरपीआयचे विभाग निहाय संयुक्त मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या दि.21 मे रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आले असून त्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण रिपाइं तर्फे देवेंद्र फडणवीस यांना यावेळी रामदास आठवले यांनी दिले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना कमळ चिन्ह देण्यात यावे याबाबत चर्चा करण्यात आली. सांगली आणि पुणे येथे रिपाइं ला उपमहापौर पद देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. केंद्र सरकार च्या विविध समिती महामंडळा मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याना पद देण्याबाबत देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले या उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली.

यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबालक, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, सुरेश बारशिंग, चंद्रशेखर कांबळे, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, संजय सोनवणे, आदी रिपाइं चे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!