टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी आज संगमनेरमध्ये सभा घेतली. या सभेला जिल्ह्यातील महत्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या नेत्यावर जोरदार टीका केली. त्यांनी संगमनेरचे उमेदवार आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाना साधला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आज बऱ्याच वर्षांनी विखे पाटील आपण भेटलो, मला आज दोन्ही बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब विखे या दोघांची आठवण येते, राधाकृष्ण आपण पुन्हा आमच्याकडेला. मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण तुम्ही तिकडचे अनुभव सांगाल, तिकडे किती कर्मदरिद्री लोक आहेत असं विधान केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी ‘मी नवलेंना विचारलं समोर कोण आहे, तुम्हाला माहीत आहे का? ते म्हणाले की समोर बाळासाहेब थोरात असले तरी मी ‘जोरात’ आहे. हे (बाळासाहेब थोरात) म्हणाले मी बाजीप्रभू देशपांडे आहे, पण बाजीप्रभूंनी रक्त सांडलं यांनी काय सांडले? तुमची अक्कल उतू गेली आणि ती सांडली, थोरात साहेब तुम्ही देखील घरी बसायला हरकत नाही, कारण तुमचा नेता बँकाँकला बसला आहे असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी ‘काँग्रेस पक्ष अडचणीत असताना मी इतरांसारखा पळून गेलो नाही, तर बाजीप्रभूप्रमाणे काम करतोय, सरड्याला हरवणारे आणि त्याच्यापेक्षा जास्त रंग बदलणारे लोक आता राज्यात दिसायला लागलेत असा म्हणत अप्रत्यक्षपणे विखेंवर टीका केली होती त्यालाच ठाकरेंनी उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181865883255230464?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181865702010978305?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181863689265152001?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

