🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – शिवसेनेचा दसरा मेळावा मंगळवारी मुंबई येथे पार पडला. यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना त्यांनी आज ईडीवर सुडाचा आरोप करणारे शरद पवार आहेत मग सन २000 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध यांच्या सरकारने कोणत्या भावनेतून कारवाई केली होती असा प्रश्न विचारला आहे.
पुढे बोलताना ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर ईडीची कारवाई केली म्हणून मी हे बोलत नाही पण ईडी कोणतीही कारवाई सुडाने करणार असेल तर आम्ही मोडून, चिरडून ठेवल्याशिवाय राहणार नाहीर असेल तर आम्ही मोडून, चिरडून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आज ईडीवर सुडाचा आरोप करणारे शरद पवार आहेत मग सन २000 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध यांच्या सरकारने कोणत्या भावनेतून कारवाई केली होती, शरद पवार आणि काँग्रेस यांचे टार्गेट जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत ते आमचे टार्गेट राहणारचं असं ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना मला कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती द्यायची आहे. युतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना सातबारा कोरा करणार असल्याचं ठाकरे म्हणाले. तसेच राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर आमच्या आस्थेचा मुद्दा आहे अयोध्येत राम मंदिर व्हावं, ही बाळासाहेबांची इच्छा होती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना राज्यातील नागरिकांना दहा रुपयात पूर्ण अन्न उपलब्ध करुन देणार, रोगराई वाढतेय त्यामुळे एक रुपयात प्राथमिक आरोग्य चाचण्या आणि त्यांची केंद्रे संपूर्ण महाराष्ट्रभर उभारणार, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा देणार, ३०० युनिटचा घरगुती वीज वापराचा दर ३० टक्क्यांनी कमी करणार असंही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181813207201021953?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181805148063948800?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181799983156092928?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
