Share

…म्हणून मी पूरग्रस्त भागाची पाहणी केली नाही : उद्धव ठाकरे 

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे. या पूरग्रस्तांना राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ‘सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाऊन मला जनतेला कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती. त्यामुळे मी या भागाचा दौरा केला नाही’, असं स्पष्टीकरण दिले. तसेच पूरग्रस्तांसाठी शिवसेनेचे काम सुरु आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘पूर ओसरल्यानंतर या भागात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेकडून या भागात डॉक्टरांची पथके रवाना करण्यात आली आहेत. याशिवाय, गुरांवर उपचार करण्यासाठीही शिवसेनेकडून १०० पशुवैद्यकांचे पथक पाठवण्यात आले आहे’, अशी माहिती दिली.

दरम्यान, राज्यातील पूरपरिस्थितीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. त्यांनी शिवसेना पक्ष आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री कसे होणार हे सांगण्यात गुंतला आहे. त्यांना पूरग्रस्तांचं काहीही देणं-घेणं नाहीये अशा शब्दात आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला  लक्ष केले होते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!