Share

राज, उद्धव किंवा आदित्य नव्हे तर ‘या’ तरुणामध्ये बाळासाहेबांना दिसली होती स्वतःची प्रतिमा

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे ही वडील आणि भावासोबत निवडणुकांच्या रणधुमाळीत दिसून आले होते. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर तेजसही प्रचारात सक्रिय झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या लाँचिगदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी तेजसचे कौतुक केलं होतं. “तेजसची तोडफोड सेना आहे, त्याची स्टाईल माझ्यासारखी, छंद माझ्याशी जुळते, वन्यजीवन त्याला आवडते,” असे त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तेजस ठाकरे हे घरात आक्रमक असल्याने त्यांना बाळासाहेब ठाकरे ‘तोडफोड सेना’ म्हणाले होते.

उद्धव ठाकरे सध्या त्याचं ब्रॅण्डिंग आणि पॉलिटिकल ली ग्रुमिंग करत आहेत. ते पाहता भविष्यात युवासेनेची सूत्र तेजस ठाकरेंकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेजस ठाकरे हे अत्यंत ‘Down to earth’ असले, तरी तो तितकाच आक्रमक आहे. विशेष म्हणजे तेजस हा मितभाषी आहे. पण त्याची शैली ही आक्रमक आहे.

तेजस ठाकरे यांचे शालेय शिक्षण माहीममधील बॉम्बे स्कॉटिश शाळेत झाले आहे. तर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये झाले आहे. सध्या तेजस ठाकरेंचे वय 23 वर्ष आहे. ते काही वर्ष शिक्षणासाठी परदेशात होते. वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे याने सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये खेकड्यांच्या ११ दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला आहे. अशाप्रकारचे अनोखे काम केल्याबद्दल तेजस यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. न्यूझिलंडमधील एका नियतकालिमध्ये याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

‘सह्याद्री’ या रांगड्या मराठी नावावरून खेकड्याची नावे ठेवण्यात आली आहेत. ‘सह्याद्रीयाना’ असे या खेकड्यांचे नामकरण करण्यात आले आहे. त्यांने शोधलेल्या खेकड्यांमध्ये एक गोड्या पाण्यातील खेकड्याच्या प्रजातीचाही समावेश आहे.

घाटीयाना बोट्टी, घाटीयाना पल्च्रा, घाटीयाना रथब्युने, गुबेरनाटोरीयाना लॉँगीपेस, गुबेरनाटोरीयाना मार्लेश्वरेनेसीस, गुबेरनाटोरीयाना वालासेई, सह्याद्रीयाना बिल्यारजानी, सह्याद्रीयाना पाछेपालूस, सह्याद्रीयाना सह्याद्रीनेसीस, सह्याद्रीयाना टेन्यूफालस, सह्याद्रीयाना वुडसासोनी अशी त्यांची नाव आहेत.

राज्याच्या पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये एक अत्यंत दुर्मिळ प्रजातीचा सापाचा देखील तेजसने शोध लावला आहे. या सापाबाबत केलेल्या अथक संशोधनामुळे या सापाच्या प्रजातीला ‘ठाकरे कॅट स्नेक’ असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, शास्त्रीय भाषेत या सापाला बोईगा ठाकेरायी असे नाव देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1206128957499686912?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1206131214601469955?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!