Share

‘बाबरी पाडली तेव्हा फक्त बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली, बाकीचे सर्व बिळात लपले होते’

Published On: 

मुंबई : आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त शिवसैनिकांना संबोधित केले. त्यात त्यांनी केंद्रातील भाजप पक्षाला खडेबोल सुनावले. सुरुवातीला आपल्या भाषणाची सुरवात त्यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन केली त्यानंतर त्यांनी ‘बराच दिवसानंतर आपल्याला असा वाव मिळाला आहे,आपला आवाज तसा कोणी आपला दाबू शकत नाही आणि आवाज दाबणारा कधीच जन्माला येऊ शकत नाही’ असे ते म्हणाले. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही जर कोणी आला तर आम्ही सोडत नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

दरम्यान सावरकर किंवा गांधी उच्चारण्याची आपली लायकी तरी आहे का असा थेट सवाल त्यांनी थेट केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांना केला आहे. पुढे ते असे म्हणाले १९९२ च्या बाबरी मशीद पाडली तेव्हा कोणी जबाबदारी स्वीकारली होती ? बाकीचे सर्व बिळात लपले होते. फक्त एकच व्यक्तीने या गोष्टीची जबाबदारी स्वीकारली होती ते होते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे ते म्हणाले. हिंदुत्व धोक्यात आहे ते परक्यांपासुन नाही तर ह्या नवहिंदुंपासुन आहे असं ते म्हणाले.

आपला देश सर्वात तरुण देश गणला जातो कारण येथे मोठी ”युवा शक्ती”आहे देश घडवल्यासाठी या युवा शक्तीला योग्य दिशा देण्याची गरज आहे. नाही तर पुढे मोठा उद्रेक होऊ शकतो असं ते म्हणाले. आगामी काळातील आपल्या कामांविषयी देखील त्यांनी माहिती दिली. महाविकासआघाडी सरकार लवकरच मराठी भाषा भवन उभारणार आहे तसेच संभाजीनगर मध्ये संतपीठ उभारणार आहोत अशी माहिती देखील त्यांनी दिली. मराठी नाटकाचा इतिहास तसेच वाटचाल सांगणारे मराठी रंगभूमी दालन तयार करणार आहोत अशी माहिती देखील त्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!