मुंबई – दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा यंदा कोरोना काळात बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित पार पडला आहे. पण, तरीही शिवसैनिकांमध्ये तोच जोश पाहायला मिळतोय. यंदाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाला लक्ष्य करणार ? ठाकरेंच्या तावडीत कोण सापडणार? या कडे सर्वांचे लक्ष लागले होते. ठाकरे यांनी आपल्या भाषणात अपेक्षेप्रमाणे विरोधकांवर शरसंधान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज विविध मुद्यांवरून भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले.
दसरा मेळावा शिवसैनिकांसांठी एक उर्जेचा स्रोतच जणू. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत दसरा मेळाव्याल्या शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं गर्दी करतात आणि एक नविन उर्जा घेऊन पक्षाच्या कामाला सुरुवात करतात. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला एक वेगळीच परंपरा आहे. गेली अनेक वर्ष शिवाजी पार्कच्या मैदानात ठाकरेंची तोफ धडधडायची. पण यंदा हा सोहळा षण्मुखानंद सभागृहात पार पडला.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले,मला कल्पना आहे बऱ्याच दिवसांनी आपल्याला वाव मिळाला आहे. आवाज आपला कुणी दाबू शकत नाही. आवाज दाबणारा जन्माला येऊ शकत नाही असे ते म्हणाले. पुत्र कर्तव्य म्हणून राजकरणात आलो आहे. अंगात धमक असेल तर अंगावर या, ईडी, सीबीआयची मदत घेऊ नका, असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भाजपचा बुरखाच फाटला’
- खरकटं उष्ट खाणाऱ्या, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान; संभाजी भिडेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
- मुख्यमंत्री पातळीवर रात्रीतून मोठ्या हालचाली, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील अडथळे केले दूर
- प्रदीर्घ काळानंतर लवकरच’सकिनाची प्रेमकथा’;सनी देओलने केली घोषणा..!
- कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रोहित पवारांवर प्रशासन कारवाई करण्याची हिम्मत दाखवणार ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

