Share

MNS | “खंजीर खुपसण्याची उद्धव ठाकरेंची सवय जुनी”; मनसेचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

Published On: 

मुंबई : शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होणार का? हा प्रश्न अनेक मुलाखतींमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना विचारला जातो. मात्र अजूनही प्रत्यक्षात हि गोष्ट घडलेली नाही. अशातच आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना-मनसे युतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.

संदीप देशपांडे यांनी युतीबाबतचा जुना किस्सा सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. २०१७ मध्ये संदीप देशपांडे आणि संतोष दुरी यांना मातोश्रीवर बोलावण्यात आलं होतं. आपल्याला एकत्र निवडणूक लढवायची आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं असल्याचं संदीप देशपांडे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी त्यावेळी आमच्याशी बोलणी केली. आम्हाला हेही सांगण्यात आलं की, आम्ही भारतीय जनता पार्टीशी लग्न मोडतो आणि त्यानंतर आपण नवीन लग्न करू. मात्र, त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, असा गंभीर आरोप संदीप देशपांडेंनी केला. “बाकी मला काही माहिती नाही, मात्र खंजीर खुपसण्याची यांची सवय जुनी आहे एवढं नक्की,” असं म्हणत संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर प्रकरणात केलेल्या आरोपावर संदीप देशपांडे यांनी बोलणं टाळलं. संदीप देशपांडे म्हणाले, “आनंद दिघेंबाबत त्यावेळी काय झालं आणि काय नाही हे मला काहीही माहिती नाही. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. जो अनुभव माणसाला स्वतःला येतो त्यावर बोलू शकतो, जो इतरांचा अनुभव आहे त्यावर मी बोलू शकत नाही.” इतरांच्या अनुभवावर मी बोलू शकत नाही, पण मी स्वतःचा अनुभव सांगू शकतो असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!