Share

Instagram Upadte | Meta लवकर लाँच करणार आहे नवीन Advertisement फॉरमॅट

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: सध्या सर्वत्र फक्त सोशल मिडीयावर येणाऱ्या नवनवीन गोष्टींची चर्चा चाललेली असते. माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या कलाकृतीला वाव मिळण्याचे देखील ठिकाण आता सोशल मिडीया झाले आहे. जग प्रसिद्ध सोशल मिडीया कंपनी Meta (मेटा) आपल्या फेसबुक आणि इंन्स्टाग्राम या अप्लिकेशनमध्ये सातत्याने काही तरी बदल करत असते.

अप्लिकेशनच्या वापराचा अधिकाधिक फायदा हा वापरकर्त्यांना व्हावा आणि त्यातून माहितीची देवाण-घेवाण व्हावी हा उद्देश या कंपनीचा असतो. अर्थातच यातून कंपनीला मोठ्या प्रमाणात फायदा देखील होत असतो. असाच फायदा आता मेटा कंपनी आपल्या इंन्स्टाग्रामवरील रिल्स बनवणाऱ्यांना देणार आहे.

रिल्स बनवणारे आपल्या रिल्सचा फायदा आता उत्पन्नाचे मोठे साधन म्हणून करू शकणार आहेत. रिल्स बनवल्याने स्टारडम प्राप्त झालेल्यांना आपण दररोज पाहातो. आता थेट कंपनीच रिल्स बनवणाऱ्यांना फायदा करून देत आहे, म्हटल्यावर रिल्स स्टारची तर चांदी होणार आहे. मेटाच्या अनूसार, प्रोफाईल फिडमध्ये जाहीराती चालतील का यावर सध्या मेटाकडून चाचणी चालू आहे. पहिल्यांदा युएसएच्या क्रिएटर्ससाठी हे फिचर उपलब्ध करण्यात येणार असल्याचं देखील मेटाकडून सांगण्यात आले आहे.

वापरकर्त्यांना सध्या इंन्स्टाग्रामकडून नोट्स या नावाने एक नवीन फिचर देण्यात आलं आहे. इंन्स्टाग्राम स्टोरी सारखा तुम्ही साठ शब्दात लिहून याचा वापर करू शकता. आपल्या फाॅलोअर्सना हे दिसणार आहे. या फिचरच्या माध्यमातून मेटाने इंन्स्टाग्रामला अधिक लोकप्रिय बनवण्याचा प्रयत्न चालवला आहे. रिल्स बनवणाऱ्यांसाठी तर इंन्स्टाग्राम त्यांच्या प्रोफाईलला जाहीरातीच्या माध्यमातून देखील संधी उपलब्ध करून देत आहे. आपल्या प्रोफाईलवरून रिल्स बनवणाऱ्यांना जाहीराती देखील करता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!