Share

उद्धव ठाकरे अयोध्याला जाणार पण ‘शरयूची’ आरती करणार नाहीत

Published On: 

मुंबई: निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्याला जाणार होते परंतु राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाल्यामुळे ठाकरेंनी अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात होता. महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत रामजन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा दौरा गेले अनेक दिवसांपासून अनेक कारणामुळे चर्चेमध्ये आहे. अखेर उद्या ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, ठाकरेंना या दौऱ्यात शरयू आरतीमध्ये सहभागी होता येणार नसल्याचं कळतंय. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं उत्तरप्रदेश सरकारनं एक नियमावली तयार केलीय. त्यानुसार ठाकरेंना शरयु आरतीमध्ये सहभागी होणार नाही अशी माहिती सध्या मिळत आहे. दरम्यान, शिवसेनेनं हिंदुत्वाची कास सोडली नसल्याचं अधोरेखित करण्यासाठी हा अयोध्या दौरा होत असल्याची चर्चा आहे. कालच ठाणे आणि नाशिकमधून काही शिवसैनिक अयोध्येच्या दिशेनं रवाना देखिल झाले आहेत.

देशात सध्या कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही या संदर्भात काही निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरयू तीरावर आरतीसाठी गर्दी होऊ नये. म्हणून दौऱ्यातील आरतीचा कार्यक्रम वगळावा, अशी विनंती करण्यात आली होती. देशातील एकूण परिस्थिती लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी ही विनंती मान्य केली आहे, असे त्यांनी सांगितले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!