🕒 1 min read
Uddhav Thackeray | मुंबई : कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना तातडीने पदावरुन हटवण्याची मागणी केली जात आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गंभीर इशारा दिला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवलं नाहीतर महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे. असंच चालत राहिलं, तर आपल्या शूरवीर राज्याच्य अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली जातील. आपल्याला फक्त मग बघत बसावे लागले. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्र द्रोह्यांना इंगा दाखवला पाहिजे. वेळ आली तर महाराष्ट्र बंद करण्याचं देखील पाहू, असा इशारा ठाकरेंनी दिला आहे.
तसेच, भाजपातील महाराष्ट्रातील प्रेमींनी बरोबर यावे. कारण पक्षीय राजकारणात अस्मिता आणि राज्य चिरडलं जात असेल, तर आपण छत्रपतींचे नाव घेण्यास नालायक आहोत. दोन चार दिवसांत सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहे. केंद्राने महाराष्ट्रात पाठवलेले सॅम्पल घरी पाठवावे, अन्यथा चांगलं वृद्धाश्रम असेल तिकडे पाठवा, असं देखील ठाकरे म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. पण, त्यांचा अपमान झाळ्यावर भाजपाकडून गुळगुळीत प्रतिक्रिया दिल्या जातात. केंद्रात ज्यांचं सरकार आहे, त्यांच्या विचारांची माणसं राज्यपाल म्हणून नेमली जातात. या माणसांची कुवत काय असते, यांची पात्रता काय असते? यांना वृद्धाश्रमातही जागा मिळत नाही. त्यांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? आपल्या राज्यपालांना राज्यपाल म्हणणे मी सोडून दिलं आहे, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Deepak Kesarkar | “संजय राऊतांएवढं वाईट…”, राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर
- Sharad Pawar | शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादीतील विश्वासू नेता करणार शिंदे गटात प्रवेश
- Hair Care Tips | वाढत्या पांढऱ्या केसांच्या समस्येला नियंत्रणात आणण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- Uddhav Thackeray | राज्यपालांना हटवलं नाही तर एकत्र येऊन महाराष्ट्र बंद पाडू..! उद्धव ठाकरे यांचा इशारा!
- Uddhav Thackeray |”उद्या पाकिस्तान निवडणुकीसाठी आपल्या देशात सुट्टी देतील” ; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
