Sharad Pawar | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेत्यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) माजी खासदार माजिद मेमन (Majeed Memen) यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माजिद मेमन यांनी याबाबतच ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्का बसणार असल्याचं म्हटलं जात आहे.
16 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मला शरद पवारांकडून मार्गदर्शन आणि सन्मान मिळाला, याबद्दल मी कृतज्ञ आहे. वैयक्तिक कारणासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसचं सदस्यत्व तत्काळ सोडत आहे. पवार साहेब आणि पक्षासोबत माझ्या शुभेच्छा आहेत, असं मेमन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, 2014 ते 2020 या काळात माजिद मेमन राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार होते. तसंच ते कायदा आणि न्याय समितीचे सदस्यही होते. पेशाने वकील असलेल्या माजिद मेमन यांनी राष्ट्रीय न्यूज चॅनल्सवर राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू देखील अनेकदा मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Hair Care Tips | वाढत्या पांढऱ्या केसांच्या समस्येला नियंत्रणात आणण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- Uddhav Thackeray | राज्यपालांना हटवलं नाही तर एकत्र येऊन महाराष्ट्र बंद पाडू..! उद्धव ठाकरे यांचा इशारा!
- Uddhav Thackeray |”उद्या पाकिस्तान निवडणुकीसाठी आपल्या देशात सुट्टी देतील” ; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला टोला
- IND vs NZ | कोण कोणावर भारी?, जाणून घ्या हेड-टू-हेड सामन्यातील आकडेवारी
- Dry Skin Tips | त्वचेवरील कोरडेपणा दूर करायचा असेल, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

