टीम महाराष्ट्र देशा :- राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटल्यानंतर देखील सत्तास्थापनेसाठी भाजपा आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे.महायुतीत मुख्यमंत्री पदावरून तेढ निर्माण झाली असल्याचे चित्र आहे. ७ नोव्हेंबर पर्यंत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये कोणतीही चर्चा होत नसून विरोधकांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान राज्यात सत्तास्थापनाच्या घडामोंडींना वेग आलेला असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ३ नोव्हेंबरला औरंगाबाद येथे ओला दुष्काळ पाहणी दौरा करणार आहेत.
दरम्यान , शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सत्तास्थापनेविषयी भाष्य करताना ‘शिवसेनेने जर ठरवलं तर बहुमत सिद्ध करू शकते असं विधान केलें आहे. तसेच जनतेचे ही इच्छा आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असं विधान केले आहे. त्यामुळे शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा स्वीकारण्याविषयी एक पाउल पुढे टाकल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1190220383066050560?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190229405945085952?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190231270485184512?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

