Share

उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार; अमित शहांची घेणार भेट

Published On: 

मुंबई: नक्षलवादी चळवळ आता दुर्गम भागातून शहरांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. तसेच नक्षलवादी कारवाया, नक्षलग्रस्त भागांचा विकास, शहरी नक्षलवाद या मुद्द्यांवर गृहमंत्री अमित शहा यांनी रविवार, २६ सप्टेंबर रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात स्वतंत्रपणे चर्चा होणार का, याबाबतही उत्सुकता ताणली गेली आहे. राज्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता अनेक अर्थांनी उद्धव ठाकरे यांची ही दिल्लीवारी चर्चेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

राज्यांमधील नक्षलवादाशी मुकाबला करण्यासाठी केंद्राचे जे राष्ट्रीय धोरण आहे व कृती आराखडा निश्चित करण्यात आलेला आहे, त्यावर बैठकीत चर्चा होणार आहे. २०१५ मध्ये केंद्राने याबाबत धोरण निश्चित केले असून त्यात सुरक्षा उपाययोजना, विकासाला चालना आणि स्थानिकांच्या हक्कांचे रक्षण हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहेत, असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा गुरुवारी एक बैठक बैलावली असून, त्यात दिल्लीतील बैठकीत मांडायचे मुद्दे निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!