Share

शिवसेना निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकणार,उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- आजचा दसऱ्याचा मुहूर्त साधून सर्वच राजकीय पक्ष राज्यात निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांच लक्ष लागल आहे.

दरम्यान, त्याआधी विजयादशमी निमित्त आज बीड येथील सावरगावात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृवात भव्य दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा देखील उपस्थित होते. या भव्य मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी जनतेकडून काहीच अपेक्षा नसल्याचं म्हंटल आहे. केवळ जनतेची सेवा करायची आहे आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे वंचितांसाठी झटायचे आहे, असे त्या म्हणाल्या.

तर काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून आपला दुसऱ्या टप्प्यातला; उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दौरा सुरू करणार आहेत.

तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातल्या सभेसाठी जागा निश्चित झाली असून ही सभा येत्या ९ तारखेला शुक्रवार पेठेतल्या सरस्वती मंदिर संस्थेच्या मैदानात होणार आहे.

 

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181513099750207488?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181513917568208896?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!