Share

राज्याचे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन्याचे धोरण ठरवणार – उद्धव ठाकरे

Published On: 

उस्मानाबाद : मुंबईत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मान्यता दिल्यानंतर यासाठीच्या तयारीला वेग धरला आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संबंधित विभागांचे मंत्री, सचिव आणि लोकप्रतिनिधीसोबत वेबिनार संवाद साधून या महाविद्यालयाच्या कामाला गती देण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्याचे आदेश संबंधिताला दिले आहेत. राज्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे धोरण लवकरच ठरवू असेही ते म्हणाले.

शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या वेबिनार संवाद मध्ये मंत्रालयातून राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते तर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के. पाटील हेही या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.

उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग येथील नव्याने स्थापन होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देण्यासाठी येत्या सोमवारी वैद्यकीय शिक्षणचे प्रधान सचिव आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी सामंजस्य कराराची आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करुन प्रस्ताव सादर करावा. आता सरकारने या दोन्हीही जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याच्या कार्यान्वयाची पूर्तता प्रशासनाने जबाबदारीने पूर्ण करावी, असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील इतर जिल्ह्यातूनही नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रस्ताव येत असल्याने याबाबत राज्याचे म्हणून एक निश्चित धोरण ठरविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दोन्हीही विभागाचे प्रधान सचिव, आरोग्य विभागाचे संचालक, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक आदींनी एकत्र बसून धोरणात्मक आराखडा सादर करावा, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत पुढील आठवडयात मुंबईत बैठकही घेऊन राज्याचे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन्या संबंधित धोरण ठरवू असेही यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!