Share

महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ, वेण्णा लेक परिसराचा होणार संपूर्ण कायापालट  

Published On: 

मुंबई  : महाबळेश्वरमधील पर्यटन विकासाचा आराखडा तयार करताना कमी कालावधीतील प्रमुख कामे प्राधान्याने त्वरीत हाती घ्यावी. मुख्य बाजारपेठेचा तसेच वेण्णा लेक परिसराचा संपूर्ण कायापालट करून पर्यटकांना तसेच स्थानिक लहान, मोठ्या व्यावसायिकांना चांगली सुविधा मिळेल. नियोजनबद्ध विकास करुन या भागाची लोकप्रियता आणखी वाढेल हे पाहावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महाबळेश्वर भागातील पर्यटनाचा विकास करण्यासंदर्भात वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत ठाकरे बोलत होते. यावेळी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह हे ऑनलाईन उपस्थित होते.

यावेळी महाबळेश्वर पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, महाबळेश्वरचा मास्टर पर्यटन विकास आराखडा तयार करताना कमी कालावधी आणि दीर्घकालीन स्वरूपात करता येईल अशा कामांची वर्गवारी करावी व त्याची टप्पेनिहाय अंमलबजावणी करावी. कमी कालावधीसाठी जी कामे तात्काळ हाती घेता येतील त्यावर लक्ष केंद्रीत करावे. महाबळेश्वर मार्केट, रस्ता रुंदीकरण व लेक परिसर याची कामे जी तात्काळ सुरू करता येतील ती कामे पहिल्या टप्प्यात हाती घ्यावीत.

पर्यटकांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात व त्या माध्यमातून पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन ही कामे करावीत. विकासप्रक्रियेत त्यांना सहभागी करून घ्यावे. जे काम करू त्या कामाचे डिझाईन, काम सुरू होण्याची तारीख, संपण्याची तारीख, कामानंतर स्थळाचे बदलणारे आकर्षक स्वरूप दाखवणारे बोर्ड लावावेत. ही कामे झाल्यास पर्यटक वाढतील, पर्यायाने स्थानिकांना लाभ होईल हे त्यांना समजावून सांगावे. वन, पर्यावरण, पर्यटन विभागाने मिळून समन्वयाने महाबळेश्वर पर्यटन विकास आराखड्याची कामे करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

महाबळेश्वरमध्ये विविध प्रकारच्या पर्यटनाला मोठा वाव आहे. यात साहसी पर्यटन, निसर्ग पर्यटन, हेरिटेज पर्यटन, धार्मिक आणि कृषी पर्यटन यासारख्या क्षेत्राचा समावेश करता येईल. आताच्या महाबळेश्वरमध्ये पहिल्या टप्प्यात मार्केट आणि लेक परिसराचे काम हाती घ्यावे. तलावाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव सादर करून त्यास मंजुरी घ्यावी. रस्त्याची रुंदी वाढून त्यात एकसमानता आणण्यास मदत होईल तसेच वेण्णा लेक परिसर ३१ जानेवारीपर्यंत सुशोभित करावा, अशा सूचनाही ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्याचा विकास करताना तो पर्यावरणपूरक व्हावा यावर भर दिला जात आहे. महाबळेश्वरसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागाचा विकास करताना पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनवाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास याचा समतोल साधला जाईल हे पाहणे गरजेचे आहे. महाबळेश्वर पर्यटन विकास मास्टर प्लॅनची यादृष्टीने अंमलबजावणी केली जाईल. रस्ते, वाहतूक व्यवस्था, पदपथ, बाजारपेठ यांची रचना, तेथील रंगसंगती, पथदिवे, व्हर्टिकल गार्डन, रस्ते क्रॉसिंग, निर्मिती यांच्यात एकसंघपणा असावा. वाहतुकीचे व्यवस्थापन असावे, अशा सूचनाही  ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

महाबळेश्वरमध्ये पोलो मैदानाची जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. त्याचे सपाटीकरण करणे आवश्यक आहे, पण त्यास केंद्रीय वन संवर्धन कायद्यांतर्गत केंद्र शासनाची मान्यता घ्यावी लागते, त्यामुळे नगर पंचायतीने हा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. त्या मैदानाची लेव्हल केल्यास तिथे पोलो स्पर्धा आयोजित करता येतील. हे तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!