🕒 1 min read
मुंबई : मुंबईत मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे.शिवसेनेनं मुंबईमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा भाजपच्या टीकेनंतर भलतीच चर्चेत आली आहे.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या स्पर्धेवरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याचे काम हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच केले नाही. काँग्रेसच्या मांडीवर बसलेले उद्धव ठाकरे आज हेच करतायत. ओवेसीला लाज वाटेल असे हे लांगुलचालन आहे.’ अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
मतांसाठी दाढ्या कुरवाळण्याचे काम हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच केले नाही. काँग्रेसच्या मांडीवर बसलेले उद्धव ठाकरे आज हेच करतायत. ओवेसीला लाज वाटेल असे हे लांगुलचालन आहे. pic.twitter.com/3epEAS2i7k
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 30, 2020
अजानमध्ये प्रचंड गोडवा – पांडुरंग सकपाळ
दरम्यान, आयोजक शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी या स्पर्धेसंदर्भात टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. अजानमध्ये प्रचंड गोडवा असून अजानचं मला नेहमीच अप्रूप वाटत राहिलं आहे. त्यामुळेच मुस्लिम समाजातील मुलांसाठी अजानची स्पर्धा घेण्याचं माझ्या मनात आलं. अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस देण्यात येईल. या स्पर्धेचा खर्च शिवसेना करणार आहे,’ असं ते म्हणाले.
दुसरीकडं, मुंबई महापालिका निवडणूका २०२२ मध्ये होणार असल्या तरी भाजप पाठोपाठ आता शिवसेना देखील या निवडणुकांसाठी सक्रिय होत असल्याचं दिसून येत आहे. भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचा शुद्ध भगवा फडकावणार असल्याची गर्जना केली होती. यानंतर, शुद्ध भगव्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच आता या स्पर्धेच्या अरोजनावरून देखील भाजप नेते शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘आता बघू त्यांचं नशीब बदलते की शिवसेनेचं नशीब बदलते’
- ‘महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही’
- कायद्यांना नाव शेतकऱ्यांचे पण फायदा अब्जाधीश मित्रांनाचं; प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका!
- हुतात्मा नितीन भालेराव अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंतिम संस्कार
- आटपाडीच्या बाजारात तब्बल दीड कोटींचा मोदी बकरा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
