मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची भायखळा कारागृहातून ५ मे रोजी सुटका झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यासोबत आमदार रवी राणाही होते. कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी नवनीत राणा यांची काल (७ मे) रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
नवनीत राणा यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षावही केला. ते म्हणाले की,‘नवनीत राणा यांची तब्येत स्थिर होत आहे. मात्र, ज्याप्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली ती अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारांनाही जी वागणूक दिली जात नाही तशाप्रकारची वागणूक त्यांना देण्यात आली आहे. या सरकारने क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत’, असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ते मागील काही दिवसांपासून कारागृहात होते. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांना बचाव पक्षाचा युक्तीवाद मान्य झाला आणि अनेक अटींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या:
- “फुले विरुद्ध टिळक हा वाद निरर्थक, शिवराय महाराष्ट्रात जन्मले हेच…”, संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य
- “हे कार्य लोकमान्य टिळकांनी केल्याचा शोध राज ठाकरेंनी…”, संजय राऊत यांचे टीकास्त्र
- “ज्यांना काहीच निर्माण करता येत नाही तेच इतिहास…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
- IPL 2022 LSG vs KKR : केएल राहूल शून्यावर OUT..! लखनऊचं कोलकाताला १७७ धावांचं आव्हान
- IPL 2022 LSG vs KKR : लखनऊ ऑन टॉप..! कोलकाताचा तब्बल ७५ धावांनी उडवला धुव्वा


