🕒 1 min read
मुंबई : देशासह राज्यात देखील कोरोना व्हायरस’ने मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक सेवा-सुविधांच्या डेडलाईनही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, असं आवाहन राज्य शासनाकडून सतत केलं जात आहे.
तसेच 234 बी अंतर्गत व्याज वाचवण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच 30 एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. फेब्रुवारी 2020 ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 22 मार्च आहे. त्यालाही मुदतवाढ देण्यास मुख्यमंत्र्यांनी सुचवलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय निर्णय घेतात, याकडे करदात्यांचे डोळे लागले आहेत. तसेच मुदतीनंतर करभरणा केल्यास लागणारा दंड, शुल्क आणि व्याजदेखील माफ करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांना केली.
दरम्यान, सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नका, अत्यंत आवश्यक असेल, पर्याय नसेल तरच त्या दिवशी बाहेर जा” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
