Share

सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप – शिवसेनेचा सत्ता स्थापनेसाठी सुरु असलेला संघर्ष टोकाला गेला आहे. सत्तास्थापनेबाबत दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरु अद्याप कोणतीही चर्चादेखील झालेली नाही. त्यातच भर म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरे रविवारी (ता. ३) औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार असून शेतकऱ्यांना भेटून शेती नुकसानीचा आढावा घेणार आहेत. एकीकडे सत्ता स्थापनेची कोंडी फुटत नसताना उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतल्याने सत्ता स्थापेचा हा पेच कसा सोडवला जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, ८ नोव्हेंबरपूर्वी राज्यात सरकार स्थापन न झाल्यास भाजपच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी दिली आहे. ही धमकी म्हणजे जनादेशाचा अपमान आहे. राष्ट्रपती कोणाच्या खिश्यात नाही. राष्ट्रपतींना या गोंधळात ओढू नये,’ असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यातच सतत स्थापनेसाठी भाजप शिवसेना एकमेकांवर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच ‘युतीत कोणतीही चर्चा झाली नाही. युतीच्या चर्चेच्या बातम्या खोट्या आहेत. कोणी शपथविधीचा मुहूर्त काढत असेल तर तो मुहूर्त महत्त्वाचा नाही. बहुमताचा मुहूर्त महत्वाचा आहे. महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होईल,’ असं म्हणत राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1190537684768309248?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1190538005917790208?s=20

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!