Share

Sharad Pawar : उद्धव ठाकरे हे शरद पवारांचं खुर्चीवर बसवलेलं बाहुलं

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील नाराजीनाट्य अजूनतरी मिटताना दिसत नाहीये. त्यातच आता जेष्ठ राजकीय विश्लेषक श्रीकांत उमरीकर (Srikanth Umarikar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. श्रीकांत उमरीकर यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

उमरीकर म्हणाले कि, उद्धव ठाकरेंकडे क्षमता नाही. अशी वेळ आली तर बाळासाहेब शेवटचा जय महाराष्ट्र करायचे आणि मंग शिवसैनिक जमा होऊन बाळासाहेबांना साद घालत.  मात्र बाळासाहेब होते तेव्हापासून कधीही उद्धव ठाकरे सर्वसामान्य शिवसैनिकांशी जवळकीने वागलेच नाहीत. त्यामुळे फक्त शरद पवारांनी त्यांचा राजकीय तडजोडीसाठी खुर्चीवर बसवलेलं त्यांच्या सोयीचं बाहुलं आहे. ते सर्व सामान्य शिवसैनिकांसाठी नाहीये. तुम्ही बाळासाहेबांसारखं मातोश्रीवर बसा पण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसा असं नाही. त्यामुळे आता त्यांनी कितीही ड्रमा केला तरी एवढ्या मोठ्या संख्येने शिवसैनिक एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहेत, असं ते म्हणाले.

दरम्यान, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे जोपर्यत मातोश्रीवर बसून होते. तोपर्यंतच ते सर्वसामान्य शिवसैनिकांना मंजूर होते. पण ज्यावेळी त्यांनी स्वतः खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न केला. ते खुर्चीवर बसले. ते कमी पडलं म्हणून मुलाला तिकीट देऊन निवडून आणून तुम्ही त्याला लगेच कॅबिनेट मंत्रीपण केलं. हे कास काय सर्व सामान्य शिवसैनिक सहन करतील. चूक तिथूनच सुरु झाली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!