Share

Uddhav Thackeray : “…तर मी राजीनामा देण्यास तयार” ; उद्धव ठाकरे यांचं आवाहन

Published On: 

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. पण ज्यांनी मी नको आहे, त्यांनी तसे येऊन सांगावे किंवा फोनवर बोलावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केले आहे.

कुणाकडे किती संख्या आहे हा विषय आपल्यासाठी गौण आहे. पण ती संख्या तुम्ही कशी जमवता, यालाही महत्त्व आहे. माझ्याविरोधात अविश्वास ठराव येण्याची वेळ येऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. आपल्या भाषणात त्यांनी काही आमदारांना जबरदस्तीने नेण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच काही आमदार हे आपल्या संपर्कात असून त्यांना परत यायचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर पाळत ठेवण्यात आली होती. तसेच काही आमदारांना जबरदस्तीने नेण्यात आले असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. “ मुख्यमंत्रीपदी मी नको असेल तर तसे मला स्पष्ट सांगा, येऊन सांगा किंवा फोनवर सांगा” असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेस आण राष्ट्रवादीने मला विरोध केला असता तर वाईट वाटले नसते, पण माझ्याच लोकांनी मला विरोध केला आहे, याचा धक्का बसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शरद पवार यांनी मला मुख्यमंत्री होण्याची अट घातली, त्यामुळे मला मुख्यमंत्री व्हावे लागले. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेल तर काय करणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे. सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा माझ्याशी येऊन का बोलला का, नाहीत? असेही त्यांनी म्हटले आहे.

माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!