Share

‘ऊध्दव ठाकरे यांची दिल की बात राजकारण ढवळून काढेल’, संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मॅरेथॉन मुलाखती पाठोपाठ आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘सामना’त मुलाखत घेण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली.

या मुलाखतीचे चित्रीकरण आज (20 जुलै) पार पडले. राज्य ते केंद्र, अगदी राम मंदिर निर्माणाचा मुद्दा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ते कोरोना प्रादुर्भाव, महाविकास आघाडीचे नेतृत्व ते सरकारचे स्थैर्य अशा प्रत्येक विषयांवर उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत भूमिका त्यांची मांडली.

संजय राऊत यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. येत्या २५ आणि २६ जुलैला ही मुलाखत प्रसिध्द होणार आहे. ‘मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामना साठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास ऊत्तरे मिळाली. ऊध्दव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. करोना पासून राम मंदिरा पर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले.. मुलाखत 25 26 जुलै रोजी वाचता पहाता येईल’. अस ट्विट करत संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.

कोरोनाचे संकट मोठे आहे खाजगी रूग्णालयांनी सहकार्य करावे – जयंत पाटील

यापूर्वी संजय राऊतांनी शरद पवार यांची मॅरेथॉन बैठक घेतली. यात त्यांनी शरद पवार यांना कोरोनापासून आघाडी सरकार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटासह अनेक प्रश्न विचारले होते. यावर शरद पवार यांनी रोखठोक उत्तरं दिली. आता उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत कुठले गौप्यस्फोट केले असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात येणार नाही: मंत्री अनिल परब

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!