Share

कोरोनाचे संकट मोठे आहे खाजगी रूग्णालयांनी सहकार्य करावे – जयंत पाटील

Published On: 

सांगली : सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये 22 जुलै रोजीच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलै अखेर लॉकडाऊन ठेवण्यात येईल. या काळात उर्वरित ग्रामीण भागातील जनतेने उत्स्फूर्तपणे स्वयंशिस्तीने जनता कर्फ्यू पाळावा. लॉकडाऊन व जनता कर्फ्यू या दोन्हींमध्ये जनतेने संपूर्ण सहकार्य द्यावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटीलयांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, सर्वश्री आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भूपाल गिरीगोसावी आदि उपस्थित होते.

सरकारचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करा, गृहमंत्र्यांचे सक्त आदेश

कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मर्यादीत ठेवण्यात यश आले आहे. प्रशासनाने केलेल्या अंमलबजावणीचे व त्यास लोकांनी दिलेल्या सहकार्याचे हे यश आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या यापुढेही मर्यादित रहावी यासाठी 22 जुलै रोजीच्या रात्री 10 वाजल्यापासून ते 30 जुलै अखेरपर्यंत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामध्ये संपूर्ण लॉकडाऊन व उर्वरित ग्रामीण भागात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. जनता कर्फ्यूच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पालन करावे. लॉकडाऊन 22 जुलै रात्री 10 नंतर सुरू होणार असल्याने नागरिकांच्या हातात पुरेसा वेळ आहे. त्यामुळे कोणीही अनावश्यक गर्दी करू नये. खरेदीसाठी झुंबड उडू नये, नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या बैठकीनंतर पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली, मिरज येथील इंडियन मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी व वैद्यकीय व्यवसायीक यांची प्रशासकीय यंत्रणांसोबत बैठक संपन्न झाली. यामध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता खाजगी रूग्णालये कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी घेणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे सर्व खाजगी व्यवसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. संकट मोठे असताना सर्वांनी मदतीचा दृष्टीकोन ठेवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मेस्मा अंतर्गत नोटीस काढण्यात येणार असून खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांनी आपल्या सर्व मनुष्यबळाला परिस्थिती समजून सांगावी व सर्वांनीच यामध्ये सहकार्य करावे. डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफची लिस्ट प्रत्येक हॉस्पीटल्सने प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी. तसेच सर्व हॉस्पीटल्सनी पाँईंट ऑफ केअरला रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट सुविधा उपलब्ध करून द्यावी. वैद्यकीय सुविधेची 80 टक्के क्षमता ही खाजगी रूग्णांलयामध्ये आहे. रूग्ण वाढीचा दर पहाता खाजगी हॉस्पीटल्सकडून डीसीएच सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात येणार नाही: मंत्री अनिल परब

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!