Share

कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात येणार नाही: मंत्री अनिल परब

Published On: 

मुंबई: कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनला आता ३ महिन्यांहून अधिक काळ होत आला आहे. तर, कोरोनाच्या धास्तीमुळे शैक्षणिक क्षेत्रांपासून ते सर्वच प्रकारच्या उद्योग-व्यवसायांना आर्थिक नुकसानीचा फटका बसला आहे. तर, कोरोनामुळे राज्यांतर्गत महामंडळाची वाहतूक देखील पूर्णपणे बंद होती.त्यामुळे सुट्टयांचा हंगाम असलेल्या एप्रिल, मे महिन्यात एसटीला आर्थिक बोजाचा फटका बसला आहे. त्यामुळे,  एसटी महामंडळानं मागील वर्षी भरती केलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं.

मात्र, हे वृत्त राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी चुकीचं असल्याचं त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे.अनिल परब यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विट मध्ये म्हणतात, ‘ यासंबंधी मीडियामधून फिरत असलेल्या बातम्या चुकीच्या असून,कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात आलेले नाही.’

पुण्यात कोरोनामुक्त पोलीस समुपदेशकाची भूमिका बजावणार : सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे

तसेच त्यांनी सद्या एसटीची सेवा हि अत्यल्प प्रमाणात सुरु असल्याने कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देत असल्याचं देखील सांगितलं. ते म्हणतात, ‘ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची सेवा अत्यल्प प्रमाणात सुरू असल्यामूळे कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.येत्या काळात गरजेनुसार सदरच्या नियुक्त्या पुन्हा करण्यात येतील.’

शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; व्हाट्सऍप ग्रुप ऍडमीनसह पोलीस पाटलावर गुन्हा दाखल

दरम्यान, एसटी महामंडळाची आर्थिक तूट कमी करण्यासाठी २०१९ मध्ये भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त होतं. त्यामुळे एसटीतील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर परब यांनी या प्रकरणावर विस्तृत भूमिका मांडली आहे.

कोविडवर लस निर्माण करण्यासाठी भारतात अत्यंत वेगाने काम सुरू आहे-गुलेरिया

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!