Share

सर्व राजकीय पक्षांनी मतभेदांना मूठमाती देऊन कोरोनाविरुद्धचे युद्ध एकत्र लढावे – अमित शहा

Published On: 

नवी दिल्ली : सर्व राजकीय पक्षांनी मतभेदांना मूठमाती देऊन कोरोनाविरुद्धचे युद्ध एकत्र लढावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते सोमवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्यास लोकांचा विश्वास वाढेल. जेणेकरून दिल्लीवरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर परतवता येईल, असे शहा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दिल्लीतील प्रत्येक नागरिकासाठी कोरोना टेस्टची सुविधा उपलब्ध करुन देण्याची घोषणाही केली.

दिल्लीत आतापर्यंत ४१ हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १३०० लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. आगामी काळात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतला आहे. सध्याच्या घडीला दिल्लीत दिवसाला ८६०० चाचण्या केल्या जात आहेत. आगामी पाच दिवसांत ही संख्या १८ हजारपर्यंत वाढवण्याचा दिल्ली सरकारचा मानस आहे.

‘महाविकास आघाडीने शेट्टींना मुख्यमंत्री करावं, मी स्वतः त्यांची मिरवणूक काढेन’

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्याऐवजी ‘आप’चे नेते संजय सिंह यांनी बैठकीला हजेरी लावली होती.

मराठवाड्यात पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!