Share

उध्दव ठाकरेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत, राज्याला भाजपमुक्त करावे- प्रा. जोगेंद्र कवाडे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रातील भाजपच्या भस्मासुराला टक्कर देण्याचे मोठे धाडसाचे काम आहे, आता उध्दव ठाकरेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे आणि राज्याला भाजपमुक्त करावे असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले आहे.

एका खाजगी कार्यक्रमानिमित्त जागेंद्र कवाडे शहरात आले असताना त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. कवाडे म्हणाले, “केंद्रातील भाजपच्या भस्मासुराला टक्कर देणे हे मोठे धाडसाचे काम आहे, शिवसेनेने हे धाडस दाखवले आहे. आता शिवसेनेने जशी मुक्ती मिळवली, तशी महाराष्ट्राला देखील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपपासून मुक्ती मिळवून द्यावी.” उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्याला कुणाचाही विरोध नाही, कॉंग्रेसनेही त्याला विरोध केलेला नाही, कारण शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असला तरी तो आता महाराष्ट्रवादी झाला आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत लवकर आणि स्थिर सरकार बनवावे. पहिला मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तरी हरकत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरीही अडचण नाही. कॉंग्रेसनेही याबाबत अशी कोणतीही अट ठेवली नसल्याचा दावा ही कवाडे यांनी यावेळी केला.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1195260153383178240?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195270009066377216?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!