टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना – भाजपमधील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर आडून बसल्याने सत्ता स्थापनेला काहीशी दिरंगाई होत असल्याचं दिसत आहे. निकाल लागून ६ दिवस झाले तरी शिवसेना – भाजपने सत्ता स्थापनेसाठी समोरासमोर बसून अद्याप चर्चा केलेली नाही. त्यामुळे महायुतीत काय तोडगा निघणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आणि भाजपमधील वाद आता शिगेला पोहचला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचा फोन टाळत आहेत. जो पर्यंत अमित शहा यांच्याशी चर्चा होत नाही, तोपर्यंत इतरांशी चर्चा करणार नाही असा निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त एबीपीमाझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.
मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असून दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. भाजप मात्र मुख्यमंत्री पद स्वतःकडेचं घेण्यासाठी आग्रही आहे. तर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार असला तरचं चर्चा करू अन्यथा आम्हला दुसरा पर्याय उपलब्ध आहे, असा इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे. त्यामुळे युतीतील तिढा दिवसेंदिवस वाढत असल्याने विधनसभा बरखास्त होण्याआधी महायुती नवीन सरकार स्थापन करणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1190257170895425536?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190261225516519425?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190264779467677696?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1190270516176678913?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

