🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: ज्याचं अन्न खातोय त्याला आम्ही जागतोय, शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला आहे, विरोधकांनी आमच्यावर टीका करण्याआधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हे पहाव. मोर्चाला नौटंकी बोलणारे नालायक आहेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेकडून पिक विमा कंपन्यां विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चावेळी ठाकरे बोलत होते.
पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, आज उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला आहे. बीकेसीतील एशियन हार्ट हॉस्पिटलपासून सुरु झालेल्या मोर्चाने विमा कंपन्यांच्या कार्यालयावर धडक घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कंपन्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
शेतकर्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना शिवसेना! #DhadakMorcha pic.twitter.com/mbk6bCHFm4
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) July 17, 2019
मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शिवसेना बांधील आहे, विमा कंपन्यांनी येत्या पंधरा दिवसांचे पैसे न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, बँकांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, पुढील पंधरा दिवसांत बँकांनी सर्व कर्जमाफीची प्रकरणे निकाली काढावी, तसेच कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकामध्ये लावावी, असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
