🕒 1 min read
Uddhav Thackeray | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यामुळे भाजप बॅकफूटवर आली आहे. या दोघांच्या वक्तव्यावर भाजपचे बहुतांश नेते मौन बाळगून आहेत. या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या दोघांचीही पाठराखण केली आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षियांना यांच्याविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी भाजपमधी महाराष्ट्रप्रेमींना देखील विनंती केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या वक्तव्यामागे कोणाचा तरी मेंदू असावा, यापूर्वी देखील त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या महापुरुषांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आहे. महाराष्ट्रात मिंधे सरकार, खोके सरकार आल्यापासून राज्याची अहवेलना होत आहे. कोणीही यावं टपलीत माराव हे बस झालं. राज्यात छत्रपतींचा झाला आणि ज्या पक्षाने केला त्यांचे नेते गुळमुळीत उत्तर देत आहे. या महाराष्ट्र द्रोह्याला बाहेर काढले पाहिजे. हे चाळे बंद करा. ह्या माणसाला परत पाठवा नाहीतर आम्हाला आंदोलन करावे लागेल”
“या सडक्या मेंदू मागे कोण आहेत? हे महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळत आहे. राज्यपाल नियुक्तीचे निकष ठरवले पाहिजे. ते निष्पक्ष असेल पाहिजे. राज्यपाल आहेत म्हणून काहीही बोलावे, असं चालणार नाही. ते स्वीकारले देखील जाणार नाही. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जुना आदर्श म्हणून अपमान केला”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
- Winter Skin Care | हिवाळ्यामध्ये चेहऱ्यावरील काळेपणा दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ हळदीचे फेस पॅक
- ANIS | मुख्यमंत्र्यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेनंतर अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेची प्रतिक्रिया; म्हणाले,
- Pakisthan Army chief | लेफ्टनंट जनरल सय्यद आसिम मुनीर घेणार पाकिस्तान लष्कर प्रमुखाची जागा
- Sharad Pawar | “…तरच पुढची चर्चा होऊ शकते”, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना शरद पवारांचे खडेबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
