नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. उदयनराजे-पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर उदयनराजे भोसले हे पहिल्यांदाच शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट पार पडली आहे.
उदयनराजेंनी या भेटीचं कारण स्पष्ट केलं आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांवरून ही भेट झाल्याचे त्यांनी सांगितलं. ‘मराठा समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गायकवाड समितीने मराठा समाजाला कुणबीप्रमाणे आरक्षण द्यावे असे सांगितले होते. मात्र, अद्यापही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही.’ असं ते म्हणाले.
तर, ‘मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं मात्र सद्या सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासन गंभीरतेने मुद्दा मांडत नाही त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे,’ अशी टीका देखील उदयनराजेंनी केली आहे. ‘महाराष्ट्र सरकारला करायचं नसेल तर तसं जाहीर करून श्वेतपत्रिका काढा ना,’ असं म्हणत त्यांनी राज्य सरकारला फटकारलं देखील आहे.
‘मराठा समाजातील सगळ्यात जेष्ठ नेते पवार साहेब आणि सध्याच्या सरकारचे सर्वेसर्वा पवार साहेब असल्याने त्यांनी लक्ष घालावे अन्यथा उद्रेक होईल आतापर्यंत शांततेत मोर्चे निघाले पण आता उद्रेक झाला तर काय होईल हे त्यांना देखील कळणार नाही,’ असा टोकाचा इशारा देखील खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर केवळ राज्यपालांना विमान नाकारणं अहंकार कसा होऊ शकतो’
- निर्मलाताई अर्थखातं कसं चालतं याचं अजित दादांकडून मार्गदर्शन घ्या – सुप्रिया सुळे
- राज्यात कॉंग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा पटोलेंचा दावा खरा ठरेल का ?
- शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारचे निर्बंध ! वाचा कशी आहे नियमावली
- आणि कार्यकारी संचालकांनी राजिनामा दिला… चर्चेला उधान


